आपल्या मुलांनी दुनियात सुरू असलेल्या स्पर्धेत कायम समोर राहावं असं प्रत्येक आई वडलांना वाटतं.पण त्यासाठी आवश्यक तो स्मार्टपणा तसेच समजदारपणा आपल्या मुलांकडे असावा अशी पालकांची इच्छा अपेक्षा असते. हे गुण मुलांमध्ये कायम राहीले तर मुलांच्या प्रगतीसाठी ते खूप फायदेशीर ठरू शकतात. समाजात वावरण्यासाठी smartphone आणि समजूतदारपणा हे दोन्ही गोष्टी खूप आवश्यक आहे आणि ते गुण मुलांमध्ये रुजवावे लागतात. हे गुण रुजवण्यासाठी आई वडलांना काही प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊन ते गुण मुलांमध्ये यावेत यासाठी काय करायला पाहिजे हे बघूया.
1. मुलांची उत्सुकता कायम ठेवायला हवी
मुलांमध्ये प्रत्येक गोष्टीबाबत खूप उत्सुकता असते. याच उत्सुकतेपोटी मुलं आपल्याला त्यांच्या वयाप्रमाणे आणि बुद्धी प्रमाणे सतत काही ना काही प्रश्न विचारत असतात. पण काहीवेळी गडबडीत आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत नाही. पण असं नाही करायचं त्यांच्याशी गप्पा मारुन त्यांच्या जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे द्यायला द्यावे.
2. सकारात्मक उदाहरण देणे
मुलांना आपण अनेकदा काही ना काही गोष्टी सांगत असतो. या गोष्टी सांगताना आपण नकळत त्यांना काही उदाहरणे हि देतो. ही उदाहरणे सकारात्मक असतील तर त्याचा मुलांवर चांगला परीणाम होते. पण त्यासाठी आपले विचारही सकारात्मक असायला पाहिजे.अशा सकारात्मक गोष्टी सांगितल्याने मुलांना आयुष्यात पुढे जाण्यास प्रोत्साहन मोटिवेशन मिळण्यास मदत मदत होते.
3. सामाजिक गुणांकडे लक्ष देणे
मुलं घरात भरपूर बोलतात किंवा दंगा मस्ती करतात. पण सामाजिक ठिकाणी जेव्हा काही सादरीकर करतांना तेव्हा मात्र मुलं खूप घाबरतात. तर असे होऊ नये यासाठी मुलांमधील सामाजिक गुणांचा विकास करण्याची खूप गरज आहे. इतर मुलांशी बोलल्यावर आणि दबाव न टाकता हळूहळू त्यांना कम्फर्टेबल केल्यास त्यांच्या मध्ये आणि कॉन्फिडन्स स्कील्स तयार होतात.
4. आव्हानात्मक गोष्टी करण्यास शिकवणे
आपण जसे जसे मोठे होतो तशी तशी आपल्या जीवनातील आव्हाने (challenges) वाढत जातात. या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याकडे स्मार्टपणा असणे खूप आवश्यक आहे. यासाठी मुलांना लहानपणापासूनच लहान मोठी आव्हाने द्यायला द्यायला पाहिजे. मुलांना एखाद्या गोष्टीत किंवा खेळामध्ये मदत करण्यापेक्षा त्यांना मार्गदर्शन करुन तीच गोष्ट स्वत: पूर्ण करायला लावल्यास त्यांचा स्मार्टपणा आणखी खूप जास्त प्रमाणात वाढू शकतो.